महाबळेश्वरपेक्षा जळगाव थंड, पारा पोहोचला ७.६ अंशांवर

राज्यात थंडीचा जोर वाढला असून राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद जळगावला करण्यात आलीय.

Updated: Dec 26, 2016, 08:51 PM IST
महाबळेश्वरपेक्षा जळगाव थंड, पारा पोहोचला ७.६ अंशांवर title=

जळगाव : राज्यात थंडीचा जोर वाढला असून राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद जळगावला करण्यात आलीय. ७.६ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद जळगावात झालीय. जळगाव शहर तसंच परिसरात जोरदार शीतलहर आल्याने जळगावकरानां चांगलाच गारठयाचा सामना करावा लागतोय.

गेल्या दोन दिवसापासून जळगावचा तापमान घट झाल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. उत्तर भारतात थंड वाऱ्याचा वेग वाढल्याने आणखीन तापमान कमी होणार आहे. जळगावात सकाळी १० वाजे पर्यंत थंड हवा असते तर संध्याकाळी सात नंतर गारठा वाढत असल्याने रस्त्यात लोकांची वर्दळ कमी झालीय. काही ठिकाणी शेकोट्या पेटून थंडी पासून बचाव केला जातोय. येत्या काही दिवस थंडी अजून वाढण्याची शक्यता हवामान खात्यान वर्तवलीय.