विद्यार्थ्यांच्या वादात एकाचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गिरड येथील जवाहर हायस्कूलच्या ग्राउंडमध्ये जागेच्या वादातून दोन विद्यार्थींमध्ये झालेल्या भांडणात इयत्ता पाचवीच्या किशोर पांचाळ या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

Updated: Jul 1, 2015, 07:40 PM IST
विद्यार्थ्यांच्या वादात एकाचा मृत्यू title=

भडगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गिरड येथील जवाहर हायस्कूलच्या ग्राउंडमध्ये जागेच्या वादातून दोन विद्यार्थींमध्ये झालेल्या भांडणात इयत्ता पाचवीच्या किशोर पांचाळ या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

आज सकाळी बारा वाजेच्या सुमारास शाळा भरण्यासाठी विद्यार्थी प्रांगणात एकत्र आले होते. त्यावेळी दोन विद्यार्थींमध्ये किरकोळ वाद निर्माण झाला होता, त्यात किशोर याला मार लागल्याने तो जागीच पडला होता. हा प्रकार शाळेतील शिक्षकांना कळताच बेशुद्ध अवस्थेत असलेल्या किशोर पांचाळ यास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान किशोर हा मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यावेळी परिसरात शोककळा पसरली होती. 

परिवारातील लोकांच्या मामागणी नंतर किशोर पांचाळ याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोऱ्याहून धुळे येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. 
यातील दोषींवर कारवाई करावी अशी मागणी परिवारातील सदस्यांनी केली आहे. 

उशिरापर्यंत भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.