जितेंद्र आव्हाड निलंबित; विरोधकांचा अधिवेशनावरच बहिष्कार

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे... आजच्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करण्यात आलंय. यामुळे चिडलेल्या विरोधकांनी हिवाळी अधिवेशनावरच बहिष्कार टाकलाय. 

Updated: Dec 12, 2014, 01:17 PM IST
जितेंद्र आव्हाड निलंबित; विरोधकांचा अधिवेशनावरच बहिष्कार title=

नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे... आजच्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करण्यात आलंय. यामुळे चिडलेल्या विरोधकांनी हिवाळी अधिवेशनावरच बहिष्कार टाकलाय. 

विधानसभेत अपशब्द वापरल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत आव्हाड यांना निलंबित करण्यात आलाय. 

यामुळे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी मात्र सरकार मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप केलाय. सरकारला विरोधकांचं म्हणणंच ऐकून घ्यायचं नाही, असं म्हणत दोन्ही पक्षांनी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्कार टाकलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.