'भारत सरकारला दहशतवाद्यांना मारण्यासाठी दहशतवादी पाहिजेत'

 राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संरक्षण मंत्र्यांच्या अतिरेक्यांना मारण्याच्या विधानाचा विरोध केला आहे. त्यासाठी त्यानी अनोखा मार्ग अवलंबला आहे. आव्हाड यांनी ठाण्यात होर्डिंग लावून त्यांच्या या विधानाचा विरोध केला आहे.

Updated: May 24, 2015, 02:40 PM IST
'भारत सरकारला दहशतवाद्यांना मारण्यासाठी दहशतवादी पाहिजेत' title=

मुंबई:  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संरक्षण मंत्र्यांच्या दहशतवाद्यांना मारण्याच्या विधानाचा विरोध केला आहे. त्यासाठी त्यानी अनोखा मार्ग अवलंबला आहे. आव्हाड यांनी ठाण्यात होर्डिंग लावून त्यांच्या या विधानाचा विरोध केला आहे.

या होर्डिंगमध्ये लिहिलं आहे की, 

वॅकेंसी! वॅकेंसी! वॅकेंसी! 
भारत सरकारला दहशतवाद्यांना मारण्यासाठी दहशतवादी पाहिजेत
संपर्क करा
श्री मनोहर पर्रिकर 
(संरक्षण मंत्री, भारत सरकार)

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संरक्षण मंत्री पर्रिकर म्हणाले होते की, पैशांच्या लालसापोटी सामान्य माणसं अतिरेकी बनतात. त्यांना दहशद पसविण्याचे पैसे मिळतात. जर लोक अशाप्रकारे अतिरेकी बनतात, तर त्यांचा उपयोग आपण का नाही करत? पर्रिकर असेही बोलले की, दहशतवाद्यांना दहशतवाद्यांविरूद्ध वापरण्यात वाईट काय आहे? नेहमी आपले सैनिकच दहशतवाद्यांना का मारणार?

जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, संरक्षण मंत्र्यांच हे वक्तव्य बेजबाबदार आहे. त्यांचा पक्ष देखील प्रज्ञा सिंहला पाठीशी घालते. यावरून त्यांच्या पक्षाचे विचार स्पष्ट होतात. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.