कल्याणमध्ये पोलिसांचं दुर्लक्ष, चोरांचं कल्याण

आता सोनसाखळी चोरांची मजल थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचले आहेत, याचा  प्रत्यय कल्याणकरांना आलाय . 

Updated: May 25, 2015, 10:15 PM IST
कल्याणमध्ये पोलिसांचं दुर्लक्ष, चोरांचं कल्याण title=

कल्याण : आता सोनसाखळी चोरांची मजल थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचले आहेत, याचा  प्रत्यय कल्याणकरांना आलाय . 

कल्याण येथील कासारहाट परिसरात विठ्ठल मंदिरासमोर राहणाऱ्या हेमलता ईशवाड या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळ सूत्र चोरट्यांनी त्यांच्या दारातूनच खेचून पळ काढला, मंगळसूत्र खेचताना हेमलता ईशवाड यांना चोरट्यांनी  अक्षरश फरफटत नेले. 

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे, रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. हेमलता ईशवाड या दारात उभ्या असतांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एक इसम तिथे आला होता.

हेमलता यांचा मुलगा त्या चोरांच्या मागे धावला मात्र ते सोनसाखळी चोर तेथून पसार झाले, या घटनेने पुन्हा एकदा कल्याण डोबीवलीत सोनसाखळी चोरांवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना सपशेल अपयश आल्याचे दिसून  आले आहे. 
पोलिस फक्त सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन नागरिकांना करत आहेत , मात्र  नागरिक सीसीटीव्ही  चौक चौकात लावत आहेत मात्र त्या सीसीटीव्ही मध्ये फक्त चोरी करताना चोर बघायचे का ? असा सवाल नागरिक विचारत आहेत.  पोलिस मात्र काहीच हालचाल करताना दिसत नाहीत, असा नागरिकांचा आरोप आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.