कोकणात हापूसच्या नावाखाली 'कानडी' बनवाबनवी

कोकणात गेल्यावर सध्या पिवळे धम्मक आंबे तुम्हाला नजरेस पडतील. ते हापूस नाही. तसेच ते देवगड हापूस नाही... अचंबित झालात ?  

Updated: Apr 30, 2016, 10:26 AM IST
कोकणात हापूसच्या नावाखाली 'कानडी' बनवाबनवी title=

सिंधुदुर्ग : कोकणात गेल्यावर सध्या पिवळे धम्मक आंबे तुम्हाला नजरेस पडतील. पण हे हापूसच असतील याचा भरोसा कोणीही देणार नाही. कारण सिंधुदुर्गात जाताना महामार्गावर दिसतात, ते हापूस नाही. तसेच ते देवगड हापूस नाही... अचंबित झालात ? इथे आहे देवगड नावाने विकला जाणारा कानडी आंबा. का तुम्हाला देवगड हापूस म्हणून पसवलं जातंय. एक रिपोर्ट.

इथेच तुम्ही फसता...

कोकणचा राजा. हापूस. सिंधुदुर्गात जाताना महामार्गावर सऱ्हास वेगवेगळे स्टॉल्स लागलेले दिसतात. तुम्ही इथे थांबता आणि कोकणातला हापूस म्हणून आनंदून जातात. पण इथेच तुम्ही फसता. कोकणचा हापूस घ्यायला जाता. तिथे ना कोकणातला माणूस असतो ना कोकणातला हापूस. इथे असतो कानडी माणूस आणि आंबाही कानडीच. तुम्ही घेता तो आंबा देवगड हापूस किंवा रत्नागिरी हापूस म्हणून विकला जातो पण तो असतो कर्नाटकातला आंबा. 

देवगडच्या नावाखाली...

दुसरीकडे कोकणात आंब्याचं पिक यावर्षी कमी आल्यानं ही परिस्थिती उद्धवल्याचंही सांगितलं जातंय. त्यामुळंच इतर राज्यातले आंबे कोकणात देवगडचा हापूस म्हणून विकले जातायत. कोकणचा आंबा यावर्षी रुसल्यानं कानडी आंब्यानं कोकणात धुडगुस घालतोय. 

भाव पडल्याने व्यापारी धास्तावले

लहरी हवामानाचा फटका बसला आणि कोकणचा आंबा ५० टक्केही हाती आला नाही. त्यातच कमी दरात मिळणाऱ्या या खोट्या हापूस आंब्यामुळे जेमतेम हाती आलेल्या देवगडची किंमत टिकवणंही कठीण होऊन बसलंय. कोकणचा हापूस यावर्षी संकटात सापडलाय त्यात कर्नाटकी हापूसने त्याच्यावर आणखी संकट आणलंय दुहेरी संकटंन आंबा व्यापारी मात्र, चांगलंच अडचणीत आलाय.