कोकण रेल्वे झाली ठप्प

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. 

Updated: Jun 27, 2016, 09:32 PM IST
कोकण रेल्वे झाली ठप्प  title=

चिपळूण : कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. चिपळूणजवळच्या कामथे बोगद्यात् इंजिनमध्ये बिघाड झालाय. यामुळे अनेक रेल्वे विविध स्टेशनवर खोळंबल्या आहेत आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. 

पनवेलवरून दुसरं इंजिन पाठवण्यात आलं आहे, हे इंजिन चिपळूणला पोहोचल्यानंतरचं कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येईल.