बाप्पा! मालगाडीचे 7 डबे घसरले, कोकण रेल्वे ठप्प

Last Updated: Sunday, August 24, 2014 - 14:02
बाप्पा! मालगाडीचे 7 डबे घसरले, कोकण रेल्वे ठप्प

रत्नागिरी: कोकण रेल्वेच्या दोन्ही मार्गावरची वाहतूक ठप्प झालीय. करंजाडी जवळ मालगाडीचे सात डबे घसरल्यानं ही वाहतूक ठप्प झालीय. 

ही वाहतूक सुरळीत होण्यास 24 तासांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं आजचा दिवस कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजचा दिवस कटकटीचा असणार आहे.  

कोकण रेल्वेवर मालगाडीघसरल्यानं कोणकोणत्या गाड्या खोळंबल्यात त्या पाहुयात...

  • रत्नागिरी-दादर एक्स्प्रेस भोके स्थानकावर खोळंबली

  • नेत्रावती एक्स्प्रेस सिंधुदुर्ग स्थानकावर खोळंबली

  • केरळ संपर्कक्रांती एक्स्प्रेस आडवली स्थानकावर खोळंबली

  • बिकानेर एक्स्प्रेस कणकवली स्थानकावर खोळंबली

  • डबलडेकर A/C, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस खोळंबण्याची शक्यता

 

या गाड्यांचे मार्ग बदलले

  • 19578 हापा-तिरुनवैल्ली एक्स्प्रेस

  • 22476 कोइंबतूर-बिकानेर एक्स्प्रेस

  • 16346 नेत्रावती एक्स्प्रेस

  • 16312 त्रिवेंद्रम-बिकानेर एक्स्प्रेस

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 First Published: Sunday, August 24, 2014 - 08:50


comments powered by Disqus