कोल्हापूरची अंबाबाई ही महालक्ष्मी नाही!

कोल्हापूरची अंबाबाई ही कोणत्याही पुराणग्रंथात ‘विष्णुपत्नी लक्ष्मी’ असल्याचा उल्लेख नाही असा सूर 'शोध अंबाबाईचा' या व्याख्यानमालेत उमटला...तर नाग न घडवणे हा पुरोहित व्यावसायाचा भाग असल्याचंही मत या काहींनी या व्याख्यानमालेत मांडलं.. 

Updated: Oct 7, 2015, 11:46 PM IST
कोल्हापूरची अंबाबाई ही महालक्ष्मी नाही! title=

प्रताप नाईक झी मीडीया कोल्हापूर : कोल्हापूरची अंबाबाई ही कोणत्याही पुराणग्रंथात ‘विष्णुपत्नी लक्ष्मी’ असल्याचा उल्लेख नाही असा सूर 'शोध अंबाबाईचा' या व्याख्यानमालेत उमटला...तर नाग न घडवणे हा पुरोहित व्यावसायाचा भाग असल्याचंही मत या काहींनी या व्याख्यानमालेत मांडलं.. 

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आणि वाद हे गेल्या काही वर्षांपासून समीकरणच बनलंय.. महिलांना गाभा-यात मज्जाव, निकृष्ट प्रसाद, भ्रष्टाचार तर कधी भक्तांना मिळणा-या सोयीसुविधांचा अभाव... त्यातच पुरातत्व विभाग, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि श्री पूजकांनी महालक्ष्मी देवीच्या मस्तकावरील नाग घडवून न आणल्यानं नव्या वादाची भर पडली... याच मुद्यावर झी 24 तासनं रोखठोक चर्चाही घडवून आणली...

आता कोल्हापूरातील करवीर निवासिनी अंबाबाई भक्त मंडळानं जनजागृती सुरु केलीय.. त्याचाच एक भाग म्हणून भक्त मंडळानं शोध अंबाबाईचा या विषयावर व्याख्यान घेऊन इतिहास उलगण्याचा प्रयत्न केला..

व्याख्यानमालेतील ठराव 

अंबाबाईच्या मूर्तीवर नाग त्वरित घडवावा, अन्यथा भक्तांचा प्रक्षोभ झाल्यास त्याची जबाबदारी देवस्थान समिती आणि श्री पूजकांची राहिल

श्री अंबाबाईला अर्पण होणा-या दक्षिणेचा हिशोब भक्तांना सांगितला जावा

देवीची पूजा करण्यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर सर्वसमावेशक पुजा-यांची नेमणूक करावी 

श्री महालक्ष्मी देवीच्या मस्तकावर नाग असल्याचे अनेक ऐतिहासीक आणि धार्मिक पुरावे आहेत. तरीदेखील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, श्री पूजक आणि पुरातत्व विभाग मूग गिळून गप्प आहे. त्यामुळं भक्तांमधुन नाराजी व्यक्त होतेय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.