व्हिडिओ : कोल्हापुरात कैद्यांची जेलमध्ये गांजा पार्टी

कोल्हापुरात गंभीर गुन्ह्यात आरोपात सध्या कंळबा तुरूंगातल्या कैद्यांची कशी चैन सुरू आहे, याचा धडधडीत पुरावा गेल्या दोन तीन दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे.

Updated: Nov 25, 2015, 08:22 PM IST

कोल्हापूर : कोल्हापुरात गंभीर गुन्ह्यात आरोपात सध्या कंळबा तुरूंगातल्या कैद्यांची कशी चैन सुरू आहे, याचा धडधडीत पुरावा गेल्या दोन तीन दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे.

या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओत कैदी गांजा ओढताना स्पष्ट दिसतायत.  या पार्टीची दृश्य व्हायरल झाल्यावर आता प्रशासनानं आता गंभीर दखल घेतलीय.  

कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी मंगळवारी कारागृहाला भेट दिली.  यावेळी संशयित कैद्यांकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यांनी सहा तासांहून अधिक काळ कारागृहाची झाडाझडती घेतल्याने अधिकारी आणि कर्मचारी हादरून गेले आहेत. 

साठे यांनी काल दुपारी कळंबा कारागृहाला भेट देऊन झाडाझडती घेतली. पुण्यातील चौधरी, परमार, सोनवणे, राठोड या कैद्यांची ओळख परेड घेतली. एक कैदी गवळी टोळीतील तर तीन आरोपी 'मोक्का'तील असल्याची माहिती पुढे आली आहे. 

व्हिडिओतील आणि प्रत्यक्षातील कैदी तेच आहेत का याची साठे शहानिशा करत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.