दुरान्तो घसरली... कोकण रेल्वे खोळंबल्या!

एर्नाकुलमहून मुंबईकडे जाणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसचे दहा डबे दक्षिण मडगावच्या बल्ली स्टेशनजवळील सारझोरा बोगद्यात घसरलेत.

Updated: May 3, 2015, 07:46 PM IST
दुरान्तो घसरली... कोकण रेल्वे खोळंबल्या! title=

रत्नागिरी: एर्नाकुलमहून मुंबईकडे जाणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसचे दहा डबे दक्षिण मडगावच्या बल्ली स्टेशनजवळील सारझोरा बोगद्यात घसरलेत. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आलीय.

अपघातानंतर कोकण रेल्वेचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले असून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु झालेत. सकाळी साडे सहाच्या सुमारास बल्ली स्टेशनजवळ ही घटना घडली, सुदैवानं यादुर्घटनेत कोणतिही जिवितहानी झालेली नाही मात्र सुटीत गावाला निघालेल्या कोकणवासियांचे आणि फिरायला गेलेल्या पर्यटकांचे यामुळे मोठे हाल होतायत.

या अपघातामुळे कोणकोणत्या ट्रेन खोळंबल्यात पाहूयात..

  • मडगाव-मंगलोर एक्सप्रेस रद्द

  • मडगाव-कारवार एक्सप्रेस रद्द

  • मडगाव-एर्नाकुलम एक्सप्रेस रद्द

  • मंगलोर-मडगाव एक्स्प्रेस कारवारपर्यंतच धावणार 

  • मंगलोर-सीएसटी एक्स्प्रेस मडगावलाच थांबवली 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.