कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार : अनंत गिते

कोकणवासियांसाठी सर्वात मोठी खुषखबर. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी केलीय. 

Updated: May 27, 2015, 04:31 PM IST
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार : अनंत गिते title=

रत्नागिरी : कोकणवासियांसाठी सर्वात मोठी खुषखबर. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी केलीय. 

जूनच्या पहिल्या आठवड्यात दुपदरीकरणाच्या कामाला शुभारंभ होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ होणार आहे. गेल्याच आठवड्यात मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणाची घोषणा अनंत गितेंनी केली होती. 

हे चौपदरीकरण डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. इंदापूर ते धाराप असे हे चौपदरीकरण होणार आहे. या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. तसंच ५० टक्के भूसंपादनही पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आलाय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.