दिल्लीच्या बिरजूनं महाराष्ट्राच्या सुनीलला धूळ चारली!

दिल्लीचा हिंद  केसरी बिरजू पहलवानने महाराष्ट्रचा  हिंद केसरी सुनील साळुंखे याला धूळ चारलीय. 

Updated: Apr 13, 2015, 10:41 PM IST
दिल्लीच्या बिरजूनं महाराष्ट्राच्या सुनीलला धूळ चारली! title=

जळगाव : दिल्लीचा हिंद  केसरी बिरजू पहलवानने महाराष्ट्रचा  हिंद केसरी सुनील साळुंखे याला धूळ चारलीय. 

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील मानाच्या कुस्तीचा किताब बिरजूनं पटकावलाय. बिरजू - सुनीलमधला सामना अतिशय उत्कंठावर्धक ठरला. 

कोल्हापूरचा  सुनील साळुंखे आणि दिल्लीचा हिन्द केसरी  बिरजू पहलावन या दोघांनीही सुरुवातीपासूनच आक्रमक खेळण्यास सुरवात केली. पण, सुनील साळुंखेचा पाय सापडल्यानं या कमजोरीचा फायदा घेत बिरजू पहलवानानं सुनीलवर मात केली. विजयी बिरजूला १ लाख एकात्तर हजारांचं रोख बक्षीस देण्यात आलं. 

यानिमित्तानं, ग्रामीण भागात पहिल्यांदाच हिंद केसरी किताब पटकावणाऱ्या पहलवानाची कुस्ती पाहण्याचा योग आला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.