विधवा महिलांना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ची महिलांकडून 'खेटरानं पूजा'

विधवा महिलांना सहानुभूती मिळवून त्यांच्याशी विविह करून मालमत्ता बळकावणाऱ्या एक लिंगपिसाट जलसेवकाला धुळ्यात शिवसेनेच्या पदाधिकारी हेमा हेमाडे यांनी शहर पोलीस ठाण्यातच चोप दिला.

Updated: May 11, 2017, 10:52 PM IST
विधवा महिलांना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ची महिलांकडून 'खेटरानं पूजा' title=

धुळे : विधवा महिलांना सहानुभूती मिळवून त्यांच्याशी विविह करून मालमत्ता बळकावणाऱ्या एक लिंगपिसाट जलसेवकाला धुळ्यात शिवसेनेच्या पदाधिकारी हेमा हेमाडे यांनी शहर पोलीस ठाण्यातच चोप दिला.

धुळे येथील पाणी पुरवठा विभागात जलसेवक म्हणून कार्यरत असलेला मुरलीधर रंगराव मिस्तरी यांचा मिनाक्षीबाई सोबत सन 2007 मध्ये पुनर्विवाह झाला. विवाहानंतर मिनाक्षीबाईंची मालमत्ता मुरलीधरने स्वतःच्या नावावर करुन घेतली.

त्यानंतर या दोघात वाद होऊ लागले. मिस्तरी मिनाक्षबाईला मारहाण करुन तिचा छळ करु लागला. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेलं. या प्रकरणी आज मिनाक्षीबाई यांच्यासह हेमा हेमाडे या शहर पोलीस ठाण्यात आल्या. त्यानंतर मिस्तरींनाही तेथे बोलविण्यात आले.

यावेळी, पोलीस ठाण्याच्या आवारातच मिस्तरी व हेमाडे यांच्यात बाचाबाची झाली... हा वाद विकोपाला गेल्याने हेमा हेमाडे यांनी थेट मिस्तरी यांची धुलाई करीतच त्यांना निरीक्षकांच्या दालनात नेले.