दरड कोसळल्याने रत्नागिरी-राई-भातगाव मार्ग बंद

मांजरे गावाजवळ दरड कोसळल्याने गुहागरला जोडणाऱ्या रत्नागिरी-राई-भातगाव मार्ग बंद झालाय. येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.

Updated: Jul 23, 2016, 12:11 PM IST
दरड कोसळल्याने रत्नागिरी-राई-भातगाव मार्ग बंद  title=

रत्नागिरी : मांजरे गावाजवळ दरड कोसळल्याने गुहागरला जोडणाऱ्या रत्नागिरी-राई-भातगाव मार्ग बंद झालाय. येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.

तालुक्यातील मांजरे गावाजवळ रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे रत्नागिरी-गुहागर मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावारची वाहतूकपूर्णपणे ठप्प झाली आहे. रत्नागिरीहून गुहागरकडे जाणा-या राई-भातगाव मार्गावरच ही दरड कोसळी असून मातीचा ढिगारा आणि मोठ मोठ दगड रस्त्यावर आलेत त्यामुळे वाहतूक आबलोलीमार्गे वळण्यात आली आहे.

राई-भातगाव पुलाच्या रत्नागिरीच्या दिशेला पहाटे ही दरड कोसळी मात्र प्रशासनाचे अधिकारी अद्यापही त्या ठिकणी पोहोचलेले नाहीत. या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. प्रशासनाकडून सकाळी साडेदहा वाजता जेसीबी पाठवण्यात आला. अद्यापही दरड बाजूला करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणा-यांचे चांगलेच हाल होत आहे.