टेमकरवाडीत तीन घरांवर दरड कोसळली, ४ जण अडकल्याची भीती

कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं दापोलीतील टेमकरवाडीत तीन घरांवर दरड कोसळल्याची घटना घडलीय. दरडीखाली ४ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

Updated: Jun 22, 2015, 03:25 PM IST
टेमकरवाडीत तीन घरांवर दरड कोसळली, ४ जण अडकल्याची भीती title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी: कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं दापोलीतील टेमकरवाडीत तीन घरांवर दरड कोसळल्याची घटना घडलीय. दरडीखाली ४ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

रात्री एकच्या सुमारास दरड कोसळल्याचं सांगण्यात येतंय. मात्र सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं मदतकार्यात अडथळा निर्माण होतोय. दरम्यान, आता जेसीबीच्या सहाय्यानं दरड बाजूला सारण्याचं काम सुरू झालंय.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं आतापर्यंत ४ जणांचे बळी गेले आहेत. शिरगाव बाणेवाडी इथं घरावर भिंत पडल्यामुळे २ मायलेकींचा मृत्यू झालाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.