दारू कंपन्यांचे ६० टक्के पाणीकपात, हाय कोर्टाचा दणका

  हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने अखेर दारू कंपन्यांना ६० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय दिला आहे. 

Updated: Apr 26, 2016, 03:12 PM IST
 दारू कंपन्यांचे ६० टक्के पाणीकपात, हाय कोर्टाचा दणका title=

औरंगाबाद : वाढती पाणीटंचाई पहाता आता उद्योग धंद्यांना मिळणाऱ्या पाणी कपातीत वाढ करण्याचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने घेतला आहे. दरम्यान, हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने अखेर दारू कंपन्यांना ६० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय दिला आहे. 

ही पाणी कपात सुरूवातीला ५० टक्के आणि १० मे नंतर पुन्हा १० टक्के केली जाईल. ही पाणी कपात टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याचं खंडपीठाने स्पष्ट केलं आहे. अन्य उद्योगांची पाणी कपात ही २० टक्क्यांवरून २५ आणि पुढील काळात ३० टक्के करणार असल्याचही खंडपीठाने स्पष्ट केलं. 

तर भविष्यात ही पाणी कपात अधिक भासली तर, दारू कंपन्यांनी आणि उद्योगांनीही स्वत:हून पाणी कपातीत वाढ करावी असंही खंडपीठानं सांगितलं. दरम्यान, यामुळे उद्योगांवर संकट उभं राहिलं आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्याचं खंडपीठाने स्पष्ट केल्यामुळे दुष्काळग्रस्तांना आणि शेतीला आवश्यक पाणी पुरवठा केला जाईल.