यापुढे, सरकारी कार्यालयांत नरेंद्र मोदींचा फोटो बंधनकारक

महाराष्ट्रात यापुढे सर्व शासकीय आणि निम-शासकीय कार्यालयांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोही टांगलेला दिसणार आहे. कारण, तसा आदेशच महाराष्ट्र सरकारनं काढलाय.

Updated: Nov 8, 2015, 12:11 PM IST
यापुढे, सरकारी कार्यालयांत नरेंद्र मोदींचा फोटो बंधनकारक title=

मुंबई : महाराष्ट्रात यापुढे सर्व शासकीय आणि निम-शासकीय कार्यालयांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोही टांगलेला दिसणार आहे. कारण, तसा आदेशच महाराष्ट्र सरकारनं काढलाय.

शुक्रवारी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारनं एक शासन निर्णय (जीआर) जाहीर केलाय. महाराष्ट्रातील मंत्री आणि मंत्र्यांचे कार्यालय यांनाही हा नियम लागू होणार आहे. 

मुंबई उच्च न्यायालय, लोकसभा आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालये यांनाही हा जीआर धाडण्यात आलाय.

मोदींचा हा फोटो 16 X 20 इंच या साईजमध्येच असायला हवा... तसंच फोटोला फ्रेमही असायला हवी, असंही यामध्ये नमूद करण्यात आलंय. मोदींचे हे फोटो मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर इथल्या सरकारी कार्यालयांत उपलब्ध होतील. 

सूत्रांच्या माहितीनुसार, हा प्रोटोकॉल असला तरी काही मंत्री आणि अधिकारी वैयक्तिक आवडी-निवडीमुळे पंतप्रधानांचा फोटो त्यांच्या कार्यालयांत लावत नाहीत, असं लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं हा जीआर जारी केलाय.

सूत्रांच्या माहितीनुसार, हा प्रोटोकॉल असला तरी काही मंत्री आणि अधिकारी वैयक्तिक आवडी-निवडीमुळे पंतप्रधानांचा फोटो त्यांच्या कार्यालयांत लावत नाहीत, असं लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं हा जीआर जारी केलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.