पोलिसांसाठी खुशखबर : सुट्टीच्या दिवशी कामाचा मिळणार पगार!

पोलिसांसाठी खुशखबर आहे. आता, पोलिसांना सुट्टीच्या दिवशी काम करताना एक दिवसाचा पगार देण्यात येणार आहे. तसंच पोलिसांसाठी घरं बांधण्यासाठी वाढीव एफएसआय देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलीय. 

Updated: Mar 31, 2015, 10:17 AM IST
पोलिसांसाठी खुशखबर : सुट्टीच्या दिवशी कामाचा मिळणार पगार! title=

मुंबई : पोलिसांसाठी खुशखबर आहे. आता, पोलिसांना सुट्टीच्या दिवशी काम करताना एक दिवसाचा पगार देण्यात येणार आहे. तसंच पोलिसांसाठी घरं बांधण्यासाठी वाढीव एफएसआय देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केलीय. 

सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या पोलिसांना आता एक दिवसाचा पगार मिळणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ झाली आहे. राज्यातील अडीच लाख पोलिसांना याचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलीय.

सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या पोलीस हवालदारांना ६८ रुपयांवरुन आता ४९० रुपये भत्ता मिळेल. तर पोलीस निरीक्षकांना १०५ रुपयांवरुन ९०२ रुपये भत्ता मिळणार आहे. म्हणजेच एक दिवसाचा पगार मिळणार आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त घरांची योजना झाली पाहिजे, याकरीता खाजगी व्यवसायिकांना हाताशी धरुन घरे बांधली जातील. पोलीस घरांसाठी चार एफएसआय देण्यात येईल, अशी महत्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय. पोलीस गृह निर्माण मंडळाचा सर्व निधी देऊन त्यांनीच घरे बांधण्याचा अधिकार राज्य सरकारनं दिला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

मुंबई पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार गौरव समारंभ पार पडला. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिला पोलीसांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.