रत्नागिरी ग्रामपंचायतीवर 'महिलाराज'!

जिल्ह्यातल्या ४१३ ग्रामपंचायतींवर आगामी काळात 'महिलाराज' दिसणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे.

Updated: Mar 31, 2015, 03:21 PM IST
रत्नागिरी ग्रामपंचायतीवर 'महिलाराज'! title=

रत्नागिरी : जिल्ह्यातल्या ४१३ ग्रामपंचायतींवर आगामी काळात 'महिलाराज' दिसणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची प्रकिया नुकतीच पार पडली. त्यात ८४७ ग्रामपंचायतींपैकी ४१३ ग्रामपंचायतीमधील सरपंच पदं महिलांसाठी राखीव झाली आहेत. 

राजकारणाचा पहिला टप्पा म्हणजे  ग्रामपंचायत निवडणूक... राजकारणात यशस्वी झालेल्या अनेक मोठ्या राजकारण्यांच्या कारकिर्दिची सुरुवात ही ग्रामपंचायत निवडणुकीपासूनच झालेली आहे. त्यामुळे अनेकजण सरपंचपदासाठी इच्छुक असतात. मात्र, ५० टक्के महिला आरक्षणामुळे  इच्छुकांची अडचण झालीय. कारण जिल्ह्यातील ८४७ ग्रामपंचायतींपैंकी ४१३ ग्रामपंचायतींचं सरपंच पद हे माहिलांसाठी आरक्षित झालंय. या निमित्ताने महिलांना या क्षेत्रात एक चांगली संधी निर्माण होताना दिसतेय, असं मत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अनुराधा लेले यांनी व्यक्त केलंय.  

गावाच्या विकासात सरपंचाचा महत्त्वाचा वाटा असतो... आणि हे पद भूषविण्याची संधी जिल्ह्यातील निम्म्या ग्रामपंचायतींमध्ये महिलांना मिळणार आहे. त्यामुळे या महिलांनी कोणाच्याही दबावाला बळी न पड़ता काम केल्यास गाव नक्कीच विकासाच्या शिखरावर पोहचू शकेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.