माळीण दुर्घटना : गुरांच्या गोठ्याप्रमाणे विस्थापितांचं जीणं

माळीण दुर्घटनेनं राज्यालाच नाही तर साऱ्या देशाला हादरवलं. मात्र, याच दुर्घनेमुळं विस्थापित करण्यात आलेल्या काही नागरिकांना जगणं नकोसं झालंय. 

Updated: Jun 30, 2015, 04:11 PM IST
माळीण दुर्घटना : गुरांच्या गोठ्याप्रमाणे विस्थापितांचं जीणं title=

चंद्रशेखर भुयार, मुंबरवाड : माळीण दुर्घटनेनं राज्यालाच नाही तर साऱ्या देशाला हादरवलं. मात्र, याच दुर्घनेमुळं विस्थापित करण्यात आलेल्या काही नागरिकांना जगणं नकोसं झालंय. 

आक्रोश आणि व्यथा आहे साखरमाची गावातल्या विस्थापितांची. साखरमाची. माळीण गावाजवळ डोंगरात वसलेलं गाव. काळीज हेलावून टाकणाऱ्या माळीण दुर्घटनेनंतर प्रशासनानं या गावातल्या कुटुंबांचं मुरबाड जवळच्या लांबाची वाडी इथं पुनर्वसन करण्यात आलं.

साखरमाचीत ९० एकर जमीन असलेल्या या कुटुंबांची अवस्था अगदी दयनीय झालीय. गुरांच्या गोठ्याप्रमाणे छोट्याशा शेडमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलीय. मुसळधार पावसात छप्पर कधीही उडून जाईल याची भिती. ना बाथरुम, ना शौचालय. ना मुलाबाळांची शाळा. 

हक्काची जमीन असूनही इथं या कुटुंबांना शेतात मिळेल ते काम किंवा मोलमजुरी करुन पोटाची खळगी भरावी लागतेय. नव्यानं देण्यात आलेल्या रेशनकार्डाचाही काही फायदा नसल्याचा आरोप हे विस्थापित करतायत.

आता या चार कुटुंबियांच्या मदतीला मुरबाडमधले काही सामाजिक कार्यकर्ते सरसावलेत. हक्काचं घरदार गमावलेल्या या कुटुंबीयांना हे विस्थापितांसारखं जगणं नकोसं झालंय.. आगीतून फुफाट्यात अडकल्याची भावना ते व्यक्त करत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.