२५ वर्षातील विक्रम... जाळ्यात सापडली ५०० किलो सुरमय...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मच्छीमारांना अचानक लॉटरी लागलीये

Updated: Feb 5, 2016, 08:28 PM IST

सिंधुदुर्ग : मत्स्य दुष्काळानं बेजार झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मच्छीमारांना अचानक लॉटरी लागलीये... 

अतिशय दुर्मिळ झालेल्या सुरमईचा मोठा साठाच त्यांच्या हाती लागलाय... थोडीथोडकी नव्हे, तर चक्क 500 किलो सुरमई जाळ्यात गावलीये... 

याची किंमत अंदाजे साडेचार लाखाच्या घरात आहे... गेल्या २५ वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरमई मिळाली नसल्याचं मच्छीमार सांगतायत... 

कोकणात गेल्या चार-पाच वर्षांपासून असलेल्या मत्स्य दुष्काळामुळे मच्छीमारीवर अवलंबून असलेल्यांवर उपासपारीची वेळ आली होती. मात्र अचानक मिळालेल्या या सागरी खजिन्यामुळे मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे... 

मोठ्या होड्यांमधून होणारी मासेमारी आंदोलनानंतर बंद झाल्यामुळे छोट्या मच्छीमारांना हा आनंद साजरा करण्याची संधी मिळाल्याचं दिसतंय...