जलसंकटातून नक्षलवाद निर्माण होण्याची शक्यता

जलसंकटातून नक्षलवाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे, असं महाराष्ट्र राज्य आदर्श ग्रामयोजनेचे प्रमुख पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. 

Updated: Mar 23, 2016, 11:37 PM IST
जलसंकटातून नक्षलवाद निर्माण होण्याची शक्यता title=

सोलापूर : जलसंकटातून नक्षलवाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे, असं महाराष्ट्र राज्य आदर्श ग्रामयोजनेचे प्रमुख पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. 

गावं टिकली नाही तर शहरांचे अस्तित्व शून्य राहील. धरणाची तोंडं शहराकडे वळताहेत. गावोगावी जलसंकट निर्माण झाल्याने गावांचे अस्तित्वही धोक्‍यात आले आहे. जलसंकटाचे निवारण तातडीने होणे गरजेचे आहे, अन्यथा दुसरा नक्षलवाद जलसंकटातून निर्माण होईल.

पोपटराव पवार यांनी सांगितलेले उपाय...  १) नैसर्गिक विहिरी जपा, गावं बोअरमुक्त करा, २) कमीत कमी पाण्यात अधिकाधिक पिकं घेण्याकडे वळा, ३) सर्व पक्षांचा राजकीय अजेंडा पाणीविषयक हवा, ४) गावातील राजकारण बिघडू देऊ नका.

जागतिक जलदिनाचे औचित्य साधून ड्रीम फाउंडेशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच अभिनव फार्मर्स क्‍लब, पुणे यांच्या वतीने आयोजित चौथ्या जलसाक्षरता संमेलनात हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांची प्रकट मुलाखत झाली.