नगराध्यक्ष निवडणूक : सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपला काँग्रेसचा दे धक्का

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग आणि वैभववाडी नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान काँग्रेसला मिळाला. काँग्रेसनं शिवसेना आणि भाजपला जबरदस्त धक्का देत या दोन्ही नगरपंचायती आपल्याकडे राखल्या.

Updated: Nov 24, 2015, 07:26 PM IST
नगराध्यक्ष निवडणूक : सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपला काँग्रेसचा दे धक्का title=

अरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग आणि वैभववाडी नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान काँग्रेसला मिळाला. काँग्रेसनं शिवसेना आणि भाजपला जबरदस्त धक्का देत या दोन्ही नगरपंचायती आपल्याकडे राखल्या.

दोडामार्ग नगरपंचायतीत काँग्रेसचे संतोष नानचे नगराध्यक्ष झालेत तर राष्ट्रवादीच्या साक्षी कोरगावकर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. वैभववाडी नगरपंचायतीत काँग्रेसचे रवींद्र रावराणे नगराध्यक्ष झालेत तर काँग्रेसच्याच संजय चव्हाण यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे.

वैभववाडी नगरपंचायतीत ग्रामविकास आघाडीच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं काँग्रेसची सरशी झाली. तर दोडामार्गमध्ये ऐनवेळी सेना-भाजप आणि मनसेच्या नगरसेवक काँग्रेससोबत गेल्यानं काँग्रेसला जोरदार धक्का बसला. यानिमित्तानं केसरकरांना चांगलाच धक्का बसलाय..तर नितेश राणेंनी आपली प्रतिष्ठा राखलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.