शेतकऱ्याचे टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन

बुलढाण्यातील मेहकरमधील युवा शेतक-यानं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. 

Updated: Dec 22, 2015, 06:28 PM IST
शेतकऱ्याचे टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन  title=

बुलढाणा : बुलढाण्यातील मेहकरमधील युवा शेतक-यानं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. 

पवन गाभणे असं आंदोलन करणा-या  शेत-याचं नाव आहे.  दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज नाकारणा-या बँके विरोधात त्यानं हे शोले स्टाईल आंदोलन केलं. 

मेहकरमधील सेन्ट्रल बँकेनं पवनला कर्ज मंजूर केलं होतं. मात्र आर्थिक देवाणघेणानातून वाद झाल्यानं या शेतक-यावर गुन्हा दाखल असल्याचं कारण पुढे करत, व्यवस्थापकानं त्याचं कर्ज नामंजूर केलं. 

पवन यांच्या भावानं बँकेवर गंभीर आरोप केलेत. न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचं त्यांनं सांगितलंय.