काटेवाडीला रंगलं मेंढ्यांचं रिंगण

ग्यानबा तुकारामच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीमध्ये पोहोचली.

Updated: Jul 17, 2015, 07:50 PM IST
काटेवाडीला रंगलं मेंढ्यांचं रिंगण title=

पुणे : ग्यानबा तुकारामच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीमध्ये पोहोचली.

काटेवाडी इथे परीट कुंटुंबाच्या वतीनं धोतरा़च्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत करण्यात आलं. ही अनोखी परंपरा बघण्यासाठी वारकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यानंतर पालखीभोवती मेंढ्यांचं रिंगण पार पडलं. 

दुपारच्या विश्रांतीनंतर रथापर्यंत पालखी खांद्यावर उचलून आणण्यात आली. पालखी रथात ठेवल्यानंतर धनगर समाजातील भाविकांनी मेंढ्यांसह रथाला प्रदक्षिणा घातली. सुमारे पंधरा मिनिंटं चालणारा हा रिंगण सोहळा पहाण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

आता पालखीनं  सणसरला प्रस्थान ठेवलं असून तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम सणसरलाच असणार आहे... तर दुसरीकडे माऊलींच्या पालखीचा लोणंदला मुक्काम आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.