मिहान प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करणार - मुख्यमंत्री

नागपूरचा मिहान प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरकरांनी दिलीय. याबाबत केंद्राशी चर्चा झाली असून सात दिवसांत कॅबिनेटमध्येही प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्याची चर्चा करण्यात येणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय.

Updated: Nov 4, 2014, 10:44 AM IST
मिहान प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करणार - मुख्यमंत्री title=

नागपूर :नागपूरचा मिहान प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरकरांनी दिलीय. याबाबत केंद्राशी चर्चा झाली असून सात दिवसांत कॅबिनेटमध्येही प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्याची चर्चा करण्यात येणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय.

मिहानसाठी महागड्या विजेचा मुद्दा गंभीर आहे. त्यामुळं स्वस्त विजेचा पर्याय शोधला जाईल. मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या पहिल्या नागपूर भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या समाधीचं दर्शन घेतलं. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या समाधीस्थळालाही मुख्यमंत्र्यांची भेट दिली आणि आदरांजली वाहिली.

डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतांना एक स्वयंसेवक म्हणून मला एक वेगळीच अनुभुती होते आहे, असा अभिप्रायही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोंदवला

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.