नेमकं काय आहे नाशिकच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये?

महापालिका निवडणुकांमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे.

Updated: Feb 23, 2017, 08:09 AM IST
नेमकं काय आहे नाशिकच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये? title=

नाशिक : महापालिका निवडणुकांमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेमध्ये नाशिकच्या केलेल्या विकासाचा दाखला दिला आहे. नाशिकमध्ये बांधण्यात आलेल्या बोटॅनिकल गार्डनचा संदर्भ त्यांनी सगळ्याच जाहीर सभांमध्ये दिला आहे.

नाशिकमधलं हे बोटॅनिकल गार्डनं नेमकं कसं आहे, याचा व्हिडिओ मनसेनं शेअर केला आहे. तीन किलोमीटरचा सायकल ट्रॅक, वनोद्यान, रानवाटा, बालोद्यान आणि लेझर शोसारख्या अनेक गोष्टी या बोटॅनिकल गार्डनमध्ये असल्याचं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. तसंच हेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात शक्य असल्याचंही या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे. 

असं आहे नाशिकचं बोटॅनिकल गार्डन