अधिकाऱ्याला माकड म्हणणे, एवढं महागात पडू शकतं?

जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळा प्रकरणातील एक कथित किस्सा पुन्हा चर्चेला आला आहे. कारण घरकुल घोटाळ्यातील विशेष कोर्टात फिर्यादी डॉ. प्रवीण गेडाम यांची उलट तपासणी करण्यात आली.

Updated: Apr 14, 2016, 07:00 PM IST
अधिकाऱ्याला माकड म्हणणे, एवढं महागात पडू शकतं? title=

धुळे : जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळा प्रकरणातील एक कथित किस्सा पुन्हा चर्चेला आला आहे. कारण घरकुल घोटाळ्यातील विशेष कोर्टात फिर्यादी डॉ. प्रवीण गेडाम यांची उलट तपासणी करण्यात आली.

जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळा प्रकरणात तत्कालीन पालिका मुख्याधिकारी प्रवीण गेडाम यांनी महत्वपूर्ण पुराव्यानिशी तक्रार दाखल केल्याने, यातून माजी मंत्री सुरेश जैन यांना बाहेर पडणे कठीण होत आहे.

कोर्टात पुन्हा माकड आणि हनुमानाचा किस्सा

सुरेश जैन यांच्या वकिलांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ प्रवीण गेडाम म्हणाले, 'मी माकड नाही. परंतु लंका जाळणार हनुमान आहे.'

काही वर्षांपूर्वी सुरेश जैन यांचे बंधू रमेश जैन यांनी मनपाच्या महासभेत आयुक्त डॉ. गेडाम यांची माकडाबरोबर तुलना केली होती. याचा राग मनात ठेवून गेडाम यांनी घरकुलाविषयी खोटी फिर्याद आणि खोटी साक्ष दिली, असा वकिलांनी उपस्थित केला, त्यावर गेडाम यांनी उत्तर दिले, 'मी माकड नाही, परंतु लंका जाळणारा हनुमान आहे.'