सासूने निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सूनेला विष पिण्यास पाडले भाग

 अमरावती शहरातील यशोदानगर  भागात राहणाऱ्या एका सुनेला सासूने, तू चोरी केली नसशील तर विष घेऊन दाखव, असे आव्हान देवून निर्दोषत्व सिध्द करण्यास सांगितले. सासूने घेतलेल्या या 'विषाच्या परीक्षेला सुन'सुद्धा तयार झाली आणि तिने विष प्राशन केले. यामध्ये ४२ वर्षीय सुनेचा मृत्यू झालाची घटना अमरावती मध्ये घडली 

Updated: Jul 27, 2016, 10:45 PM IST
सासूने निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सूनेला विष पिण्यास पाडले भाग  title=

राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती :  अमरावती शहरातील यशोदानगर  भागात राहणाऱ्या एका सुनेला सासूने, तू चोरी केली नसशील तर विष घेऊन दाखव, असे आव्हान देवून निर्दोषत्व सिध्द करण्यास सांगितले. सासूने घेतलेल्या या 'विषाच्या परीक्षेला सुन'सुद्धा तयार झाली आणि तिने विष प्राशन केले. यामध्ये ४२ वर्षीय सुनेचा मृत्यू झालाची घटना अमरावती मध्ये घडली 

सासूने घेतलेल्या अग्निपरिक्षेत सुनेला आपला जीव गमवावा लागल्याची  धक्कादायक घटना अमरावतीच्या यशोदा कॉलनीत घडलीय. 

चोरीचा आळ घेत सासू पुष्पा येवतीकरने आपली सून भारतीला विष प्राशन करण्यास भाग पाडलं. महेंद्र येवतीकरशी लग्न झाल्यापासून सासू पुष्पा नेहमीच काहीना काही कारणावरून भारतीशी वाद घालायची. काही दिवसांपूर्वी 10 हजार रुपये चोरल्याचा आरोप सासू पुष्पाने सुनेवर केला. आणि तू चोरी केली नसशील तर विष पिऊन दाखव आणि निर्दोषत्व सिध्द करून दाखव असा तिच्यावर दबाव टाकला. तिच्या हातात विष देऊन ते घेण्यास तिला भाग पाडलं. मात्र स्वत:च निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी घेतलेल्या विषामुळे भारतीचा मृ्त्यू झाला. 

याप्रकरणी सासू पुष्पा येवतीकरला पोलिसांनी अटक केलीय. न्यायलयात हजर केल्यानंतर तिची रवानगी महिला पोलिस कोठडीत करण्यात आलीय.

याप्रकरणाचा पोलिस अधिक तपास करीत असून या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडालीय.