पुण्यातील मुळा-मुठा नदींचे होणार शुद्धीकरण

पुण्यातील मुळा, मुठा नदींचे शुद्धीकरण करण्यासाठी जापानच्या जायका सोबत कर्ज करार केलाय. त्यामुळे या नद्या शुद्ध होण्याचा मार्ग मोकळा झालाय.

Updated: Jan 13, 2016, 04:59 PM IST
पुण्यातील मुळा-मुठा नदींचे होणार शुद्धीकरण title=

नवी दिल्ली : पुण्यातील मुळा, मुठा नदींचे शुद्धीकरण करण्यासाठी जापानच्या जायका सोबत कर्ज करार केलाय. त्यामुळे या नद्या शुद्ध होण्याचा मार्ग मोकळा झालाय.

 जपानची जायका १ हजार कोटीचं कर्ज देणार आहे. हे कर्ज  ४० वर्षात फेडण्याची अट घालण्यात आली आहे.  केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आणि जायकाचे अँबेसेडर यांनी या कर्जकरारावर सह्या केल्या आहेत. 

११ नवीन मलजल शोधन यंत्राचं निर्माण केलं जाईल. याअंतर्गत पुण्याच्या मुळा, मुठा नदी शुद्धीकरणासाठी १४८ कोटी  देण्यात येणार आहेत. जायकाकडून देशासाठी १ हजार कोटी देण्यात येणार आहेत.