पालिका निवडणूक : नवी मुंबईतील प्रचार सोशल मीडियावर

नवी मुंबईत प्रचार शिगेला पोहोचलाय. प्रचाराचा अंतिम टप्प्यात विविध पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवार प्रयत्न करतायेत. उमेदवारांनी प्रचाराचा नवा फंडा कोणता अवलंबलाय. त्यासाठी सोशल मीडियाला हाताशी धरले आहे.

Updated: Apr 17, 2015, 09:08 AM IST
पालिका निवडणूक : नवी मुंबईतील प्रचार सोशल मीडियावर title=

नवी मुंबई : नवी मुंबईत प्रचार शिगेला पोहोचलाय. प्रचाराचा अंतिम टप्प्यात विविध पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवार प्रयत्न करतायेत. उमेदवारांनी प्रचाराचा नवा फंडा कोणता अवलंबलाय. त्यासाठी सोशल मीडियाला हाताशी धरले आहे.

नवी मुंबई निवडणुकीचा प्रचार रंगात आलाय. असं असताना राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि उमेदवार मंडळी रमलीत मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये. प्रचाराचं काम सोडून हे काय करतायत, असा विचार तुमच्या मनातही आला असेल. मात्र ही मंडळी टाईमपास करत नसून ते इथंही प्रचार करतायेत. 

नवी मुंबईतल्या तरुण उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करत प्रचार सुरु केलाय..व्हॉट्सअॅप, फेसबूक, ट्विटरच्या माध्यमातून हायटेक प्रचार यंत्रणा राबवली जातेय. अवघ्या काही क्षणात अनेक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा फंडा सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांना भावतोय.

सर्वच पक्षांत झालेली बंडखोरी आणि प्रचाराला मिळालेला कमी वेळ या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातला प्रचार बेस्ट असल्याचं उमेदवारांना वाटतंय. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत तरुण मतदाराची मतं महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळं तरुणांना आकर्षित करण्यासाठी सर्वच उमेदवार सोशल मीडियाचा प्रभावी वापर करतायेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.