कोथरुड येथे डोक्यात कोयत्याने वार करून तरुणाचा खून

कोथरूड परिसरातील एरंडवण्यातील पौंड फाटा इथल्या पुलाखाली आज सकाळी ११ वाजता दशभुजा मित्र मंडळाचा अध्यक्ष सागर शिंदे याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला.

Updated: Feb 23, 2016, 10:11 PM IST
कोथरुड येथे डोक्यात कोयत्याने वार करून तरुणाचा खून  title=

पुणे : कोथरूड परिसरातील एरंडवण्यातील पौंड फाटा इथल्या पुलाखाली आज सकाळी ११ वाजता दशभुजा मित्र मंडळाचा अध्यक्ष सागर शिंदे याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला.

भर दिवसा रहदरीच्या ठिकाणी हा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली, हल्लेखोरांनी सागरच्या डोक्यात कोयत्याने वार केले आणि खुनी हल्ला करून आरोपी पसार झाले. 

जबर जखमी झालेल्या सागरला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. जमिनीच्या खरेदी विक्रीचं काम करणाऱ्या सागरचा खून हा जमिनीच्या वादातून झाल्याचं पोलिसनी सांगितलं. 

दरम्यान पोलिसांनी तत्काळ तपास करत सागरवर हल्ल्ला करणाऱ्या संजय मोहोळ आणि शिंदे या दोघांना ताब्यात घेतलंय.