बोगस डिग्री रॅकेटच्या सखोल चौकशीचे आदेश

या संपूर्ण बातमीची तसेच झी २४ तासने केलेल्या स्टिंग ऑपरेशनची संपूर्ण सीडी तपासण्याचे आदेश निंबाळकर यांनी दिले. 

Updated: Dec 18, 2016, 03:35 PM IST
बोगस डिग्री रॅकेटच्या सखोल चौकशीचे आदेश title=

नागपूर : झी २४ तासने उघडकीस आणलेले बोगस डिग्री रॅकेटची सखोल चौकशी करण्याचे आदेश विधान परिषदेचे सभापती निंबाळकर यांनी दिले आहेत. 

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विशेष उल्लेखाच्या माध्यमाने भाजप आमदार अनिल सोले यांनी हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला. 

या संपूर्ण बातमीची तसेच झी २४ तासने केलेल्या स्टिंग ऑपरेशनची संपूर्ण सीडी तपासण्याचे आदेश निंबाळकर यांनी दिले. 

संपूर्ण राज्यात खळबळ माजविणाऱ्या बोगस डिग्री रॅकेटचा पर्दाफाश झी २४ तासने केला होता आणि त्या नंतर जागे झालेल्या राज्य सरकारने त्री-सदस्य समितीची स्थापना केली होती, तसेच याबद्दल नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील होत यातील आरोपी शिव हरी लोडेला अटक देखील केली होती. 

आता विधान परिषदेत हा मुद्दा गाजल्याने यात वेगाने कारवाई होण्याची शक्यता आहे.