नागपूर जेल कैदी प्रकरण : दोघांकडून ५ देशी कट्टे, ३७ जिवंत काडतूसं जप्त

नागपूर जेल ब्रेक प्रकरणी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधावारी आणखी दोन गुन्हेगारांना पकडले आहे. पोलिसांनी त्यांच्याक़डून ५ देशी कट्टे आणि ३७ जिवंत काडतूसं जप्त केली. 

Updated: Apr 9, 2015, 02:49 PM IST
नागपूर जेल कैदी प्रकरण :  दोघांकडून  ५ देशी कट्टे, ३७ जिवंत काडतूसं जप्त title=

नागपूर : नागपूर जेल ब्रेक प्रकरणी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधावारी आणखी दोन गुन्हेगारांना पकडले आहे. पोलिसांनी त्यांच्याक़डून ५ देशी कट्टे आणि ३७ जिवंत काडतूसं जप्त केली. 

फरार कैद्यांना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी शेख वाजीद मोहमंद ऊर्फ राजू बढियारा उर्फ अबरार आणि चेतन ऊर्फ अविर सुनील हजारे यांना अटक केली आहे. त्यांच्याक़डून ५ देशी कट्टे आणि ३७ जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली आहेत.

पळून जाणाऱ्या कैद्यांना पैसे आणि गाडी पुरवण्याचं काम या दोघांनी केले. त्यांच्याकडून पळून गेलेल्या कैद्यांबाबत महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी यापूर्वीही दोघांना अटक केली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.