मिसरुडही फुटलं नाही, अन् रचला अपहरणाचा कट

एका व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करण्याचा मनसुबा, नागपूर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं उधळून लावलाय. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. गंभीर बाब म्हणजे हे पाचही आरोपी अल्पवयीन आहेत. 

Updated: Feb 11, 2015, 12:42 PM IST
मिसरुडही फुटलं नाही, अन् रचला अपहरणाचा कट title=

नागपूर : एका व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करण्याचा मनसुबा, नागपूर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं उधळून लावलाय. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. गंभीर बाब म्हणजे हे पाचही आरोपी अल्पवयीन आहेत. 

नागपूरमधल्या मोमिनपुरा भागात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबानं सुटकेचा निश्वास सोडलाय. कारण त्यांच्या ८ वर्षांच्या मुलाचं अपहरण करण्याचा कट आखला गेला होता. आणि हा कट आखणारे पाचही आरोपी होते अवघ्या १६-१७ वर्षांचे... 

नागपूरमधल्या पाचपावली पोलिसांनी संशयावरून एका दुचाकीवरच्या तिघा अल्पवयीन मुलांना हटकलं होतं. त्यांच्याकडे पोलिसांना एक स्प्रे सापडला. त्यावर गाड्या चोरुन त्यांचा स्प्रेच्या मदतीनं रंग बदलून विकत असल्याचं या मुलांनी पहिल्यांदा सांगितलं. मात्र, आणखी चौकशीत, या मुलांनी अपहरणाचा कट आखल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती आली.

नागपूरमधल्या मोमिनपुरा भागात राहणाऱ्या मोइनुद्दिन अन्सारी यांना धमकीचे फोन येत होते. ५ कोटी रुपयांची खंडणी फोनवरुन मागितली जायची. ती धमकी याच पाच मुलांनी दिल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. विशेष म्हणजे हे सर्व आरोपी अल्पवयीन असले तरीही, त्यांनी अपहरणाचा कट अतिशय पद्धतशीरपणे आखला होता. मात्र पोलिसांनी वेळीच त्यांचा डाव हाणून पाडला. 
 
 पोलिसांनी या टोळक्याकडून चार गाड्या जप्त केल्या आहेत. तर त्यांनी अशाप्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करताहेत. 
  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.