नॅचरोपॅथीच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चौघांना अटक

नॅचरोपॅथी उपचाराच्या नावाखाली देह व्यापार सुरु असल्याचा धक्कादायक खुलासा नागपुरात झाला आहे. विशेष म्हणजे या आधीच्या कारवाईत पकडलेल्या तरुणीच, पुन्हा यावेळच्या कारवाईत सापडल्या. 

Updated: Nov 3, 2015, 02:24 PM IST
नॅचरोपॅथीच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चौघांना अटक title=

अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर: नॅचरोपॅथी उपचाराच्या नावाखाली देह व्यापार सुरु असल्याचा धक्कादायक खुलासा नागपुरात झाला आहे. विशेष म्हणजे या आधीच्या कारवाईत पकडलेल्या तरुणीच, पुन्हा यावेळच्या कारवाईत सापडल्या. 

पश्चिम नागपुरातल्या उच्चभ्रू अशा शिवाजी नगर भागामधल्या १६०, विष्णू कमल या निवासी संकुलात सेक्स रॅकेट सुरु होतं. सात्विक नॅचरोपॅथी या नावाखाली हे सेक्स रॅकेट इथं काही महिन्यांपासून बिनबोभाट सुरु होतं. या संबंधीची माहिती मिळताच सामाजिक सुरक्षा विभागानं इथं धाड टाकून एका दलालाला ताब्यात घेतलं, तर ४ मुलींची सुटका केली. विशेष म्हणजे या आधी अशाच एका कारवाईमध्ये ताब्यात घेतलेल्या ३ तरुणी, यावेळच्या कारवाई दरम्यान पुन्हा सापडल्या. 

आणखी वाचा - सेक्स नकली, पोलिस नकली, गंडा मात्र लाखोंचा

सतत १५ दिवस पाळत ठेऊन ही कारवाई केली. मसाज पार्लरनंतर आता नेचरोपेथी उपचाराच्या सबबीखाली सेक्स रॅकेट सुरु झालं आहे. या आधी पकडलेल्या मुली पुन्हा या कारवाईत सापडल्या, असं सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजाराम पोवार यांनी सांगितलं.  

या घटनेतून एक प्रश्न समोर येतो तो म्हणजे अशा कारवाईत तरुणींना पकडून सुधारगृहात पाठवलं जातं. तिथून सुटल्यानंतर या तरुणी पुन्हा याच व्यवसायाकडे वळतात, ही वस्तुस्थितीच सारं काही सांगून जाते. 

आणखी वाचा - सेक्स रॅकेटमध्ये सहभागी अभिनेत्रीला पकडलं रंगेहाथ

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.