सात तरुणांचा जीव घेणारा हाच तो सेल्फी

नागपूरमध्ये ज्या सात मित्रांचा काल सेल्फी काढताना जीव गेला, तोच हा सेल्फी... नागपूरमधल्या वडद गावातल्या मंगरूळ तलावात सुट्टीच्या दिवशी दहा मित्र पिकनिकला गेले होते. 

Updated: Mar 24, 2015, 08:48 PM IST
सात तरुणांचा जीव घेणारा हाच तो सेल्फी title=

नागपूर: नागपूरमध्ये ज्या सात मित्रांचा काल सेल्फी काढताना जीव गेला, तोच हा सेल्फी... नागपूरमधल्या वडद गावातल्या मंगरूळ तलावात सुट्टीच्या दिवशी दहा मित्र पिकनिकला गेले होते. 

चेतन आदमने आणि हर्षल प्रकाश हे सख्खे भाऊ, रामा शिवरकर, गोवर्धन थाटे, राहुल वालोदे, मकसूद शेख अब्दुल सय्यद आणि सर्फराज शेख आणि त्यांचे तीन मित्र तलावात मजा करण्यासाठी गेले. 

तलावावर बोट बांधली होती. पण नावाडी नसतानाही हे सगळे तरुण स्वतः बोटीत बसले आणि वल्हवत
तलावात गेले. तलावात बरंच पुढे गेल्यावर त्यांना सेल्फी काढण्याची आयडिया सुचली.  हा त्याचवेळी त्यांनी काढलेला सेल्फी.... ज्यानं या सर्वांचा जीव घेतला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.