घराच्या नेमप्लेटवर चिमुकलीचं किंवा गृहलक्ष्मीचं नाव

या उपक्रमामुळे स्त्रीया सुखावल्या आहेत. या प्रयत्नांतून चित्र पालटेल असा विश्वास त्या व्यक्त करतायत. 

Updated: Dec 12, 2016, 05:59 PM IST
घराच्या नेमप्लेटवर चिमुकलीचं किंवा गृहलक्ष्मीचं नाव title=

औरंगाबाद : महिलांवर होणारे अत्याचार थांबावे, त्यांना मिळणारी दुय्यम वागणूक थांबावी यासाठी सर्वच स्तरावर विविध उपक्रम राबवले जातात, जनजागृती केली जाते. पण औरंगाबादमधल्या एका सामाजिक संस्थेनं एक वेगळाच उपक्रम राबवतेय.

पिसादेवी परिसरातल्या प्रत्येक घरावर नवी नेमप्लेट लावली जातेय. या प्रत्येक नेमप्लेटवर त्या घरातल्या चिमुकलीचं आणि गृहलक्ष्मीचं नाव आहे. महिलांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, आणि समाजाच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय. 

या उपक्रमामुळे स्त्रीया सुखावल्या आहेत. या प्रयत्नांतून चित्र पालटेल असा विश्वास त्या व्यक्त करतायत. 

सुरूवातीला दोन कॉलनीमधल्या 60 घरांवर या पाट्या लावल्यायत. या उपक्रमाच्या माध्यमातून लेकींचा जागर असाच सुरू राहिला तर समाजात मुली आणि महिलांसाठी आशादायक चित्र निर्माण होईल.