राणे भाजपात गेले तरी शिवसेनेला फरक नाही - देसाई

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे सध्या प्रचंड नाराज आहेत. ते भाजपमध्ये जाण्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर शिवसेनेने प्रतिक्रिया दिलेय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 5, 2017, 08:37 PM IST
राणे भाजपात गेले तरी शिवसेनेला फरक नाही - देसाई title=

कोल्हापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे सध्या प्रचंड नाराज आहेत. ते भाजपमध्ये जाण्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर शिवसेनेने प्रतिक्रिया दिलेय. राणे कोठेही गेले तरी काहीही फरक पडत नाही. भाजपमध्ये राणे गेले तरी सेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भाजपनं नारायण राणेंना पक्षात प्रवेश दिल्यास शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याच्या बातम्यांचं आज उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी खंडन केलंय. अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुक उद्धव ठाकरे यांनी केलं नसल्याचं देसाईंनी कोल्हापुरात स्पष्ट केलं. शिवसेना राणेंना महत्त्वही देत नसल्याचं देसाईंनी सांगितलं.  

शिवसेना सरकारचा पाठिंबा काढणार नाही, असे नमूद करताना पुढील निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार, असे सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. नारायण राणे भाजपमध्ये गेल्यास शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार, या बातम्या चुकीच्या आहेत. राणे कोणत्याही पक्षात गेले तरी शिवसेनेला काहीच फरत पडणार नाही, असेही देसाई यावेळी म्हणाले.

राणे कोणत्या पक्षात जातात, त्यांना कोणता पक्ष स्वीकारतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याने शिवसेनेला काहीही फरक पडत नाही, असे देसाई म्हणाले.