मलिकांनी राज ठाकरेंना लगावला `त्या` गोष्टीवरून टोला

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, September 19, 2013 - 23:43

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येबाबत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सरकारवरच निशाणा साधलाय. राज ठाकरेंनी दाभोलकर हत्या प्रकरणी सरकारवर केलेल्या टीकेप्रकरणी माणिकरावांनी त्याला उत्तर दिलं.
राज ठाकरे हे केवळ प्रसिद्धीसाठीच आरोप करत असल्याची टीका माणिकरावांनी केलीय. राज नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी अशी वक्तव्य करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. ते नागपुरात बोलत होते.
तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांनीही राज ठाकरे यांच्या स्टेट स्पाँसर्ड मर्डरच्या आरोपाला उत्तर दिलं आहे. स्टेट स्पाँसर्ड मर्डरचा राज ठाकरे यांना चांगलाच अनुभव असल्याचं म्हणलं आणि शिवसेनेची सत्ता असताना झालेल्या रमेश किणी हत्येप्रकरणातील राज ठाकरे यांच्यावरील आरोपांची आठवण करून दिली.
एक महिना झाला तरी दाभोलकरांचे मारेकरी सापडत नाहीयेत. ही हत्या सरकार स्पाँसर्ड आहे का असा थेट सवालच राज ठाकरे यांनी विचारलाय. दाभोलकरांसंदर्भातल्या एका पुस्तक प्रकाशनावेळी त्यांनी हा आरोप केलाय. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी हा आरोप फेटाळून लावलाय. राज ठाकरे प्रसिद्धीसाठी आरोप करतात असा टोला माणिकरावांनी लगावलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, September 19, 2013 - 23:42
comments powered by Disqus