राष्ट्रवादीच्या बेपत्ता नगरसेविकेची आत्महत्या

बेपत्ता नगरसेविका शशिकला मालादी यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, हा घातपात असल्याचा संशय मालादी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Updated: Oct 2, 2015, 08:23 PM IST
राष्ट्रवादीच्या बेपत्ता नगरसेविकेची आत्महत्या title=

नवी मुंबई : बेपत्ता नगरसेविका शशिकला मालादी यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, हा घातपात असल्याचा संशय मालादी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

नवी मुंबईमधील नेरुळ येथील राष्ट्रवादीच्या बेपत्ता  नगरसेविका शशिकला मालादी यांनी आत्महत्या केल्याच स्पष्ट झाले आहे. २३ सप्टेंबरला आत्महत्या केल्याच समोर आले आहे. त्यांनी मानखुर्द जवळ रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

शशिकला या २३ सप्टेंबरपासूनच बेपत्ता होत्या. त्याच दिवशी मानखुर्दजवळ रेल्वे रुळावर एक मृतदेह सापडला होता. मात्र हा मृतदेह कोणाचा याची ओळख पटत नव्हती. दरम्यान, हा मृतदेह शशिकला यांचाच असल्याचं समोर आले आहे.

दरम्यान, मानसिक तणावाखाली असल्याने शशिकला मालादी यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र हा मानसिक तणाव नेमका कसला होता याबाबत पोलीस तपास करत आहेत.

शशिकला या नवी मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड क्र. ८८च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. त्या आरक्षित प्रभागातून निवडून आल्या होत्या. मात्र त्यांच्या उमेदवारीवर काहींनी शंका उपस्थित केली होती. त्याबाबत माहिती अधिकाराअंतर्गत माहितीही मागवण्यात आली होती. याशिवाय काही गणपती मंडळाबाबतही त्यांचे वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे मालदी यांच्या कुटुंबियांनी शशिकला मालादी यांच्या आत्महत्याबाबत संशय व्यक्त करुन चौकशीची मागणी केली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.