राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजितदादांसमोर मुख्यमंत्र्यांवर स्तूतीसुमनं

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी चक्क अजित पवारांच्या समोरच मुख्यमंत्र्यांवर स्तूतीसुमनं उधळली. इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते.

Updated: Nov 6, 2016, 04:54 PM IST
राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजितदादांसमोर मुख्यमंत्र्यांवर स्तूतीसुमनं title=

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी चक्क अजित पवारांच्या समोरच मुख्यमंत्र्यांवर स्तूतीसुमनं उधळली. इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते.

विकास आराखड्याला मंजुरी देताना केलेल्या सहकार्या मुळे त्यांनी चक्क अजित पवार यांच्या समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुती सुमने उधळली..चक्क अजित पवार यांच्यासमोर स्तुती सुमने उधळल्याने आमदार दत्तात्रय भरणे यांची पवार कानउघाडणी करतील की काय अशी चर्चा आता रंगते आहे.