राष्ट्रवादीच्या लक्ष्मणराव ढोबळेंवर बलात्काराचा आरोप

माजी पाणीपुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी नेते लक्ष्मणराव ढोबळे यांच्याविरोधात बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये बलात्कराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Updated: Sep 13, 2014, 06:43 PM IST
राष्ट्रवादीच्या लक्ष्मणराव ढोबळेंवर बलात्काराचा आरोप title=

मुंबई : माजी पाणीपुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी नेते लक्ष्मणराव ढोबळे यांच्याविरोधात बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये बलात्कराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

अश्लील फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देत लक्ष्मणराव ढोबळे यांनी 3 वेळा बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं तक्रारीत केलाय. मुंबईतल्या गोराई परिसरात ढोबळेंचं नालंदा महाविद्यालय आहे. पीडित महिला ही याच महाविद्यालयात गेल्या 9 वर्षांपासून काम करते. दरम्यान लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप त्यांनी फेटाळलेत. 

लक्ष्मणराव ढोबळे हे सोलापूरमधील मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. दरम्यान लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप त्यांनी फेटाळले आहेत. तक्रारदार महिलेनं आपल्या शैक्षणिक संस्थेतील 80 लाख रुपये लाटलेत. त्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सूडबुद्धीनं ही बलात्काराची तक्रार दाखल केल्याचा दावा ढोबळेंनी केलाय. 

ढोबळे यांनी धमकी देऊन आपल्यावर तीनवेळा बलात्कार केल्याचे संबंधित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ढोबळे यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेसुद्धा या महिलेने सांगितले आहे. पोलिसांनी ढोबळेंविरोधात कलम ३७६, ३२३ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.