राष्ट्रवादी-भाजप आमने सामने येण्याची शक्यता

एफ.आर.पीच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे. 

Updated: Jun 6, 2015, 08:53 AM IST
राष्ट्रवादी-भाजप आमने सामने येण्याची शक्यता title=

कोल्हापूर : एफ.आर.पीच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे. 

कोल्हापुरात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी, कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढणार, अशी भूमिका राष्ट्रवादी पक्षानं घेतली आहे. 

सहकारमंत्र्यांनी हा मोर्चा वैयक्तीक न घेता शेतक-यांचा प्रश्न म्हणुन विचारात घ्यावा असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले आहे. 

राष्ट्रवादी पक्षानं सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने प्रती मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं एफ.आर.पीच्या प्रश्नांवरुन राष्ट्रवादी आणि भाजपा आमने सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.