'उद्धव ठाकरेंची संपत्ती शोधण्याची वेळ आली'

भाजप अध्यक्ष अमित शहांची संपत्ती जाहीर करण्याची मागणी शिवसेनेनं केल्यानंतर आता भाजपनं याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Updated: Feb 17, 2017, 05:50 PM IST
'उद्धव ठाकरेंची संपत्ती शोधण्याची वेळ आली'

नाशिक : भाजप अध्यक्ष अमित शहांची संपत्ती जाहीर करण्याची मागणी शिवसेनेनं केल्यानंतर आता भाजपनं याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शहांची संपत्ती निवडणूक आयोगाच्या वेब साईटवर आहे. ठाकरेंची संपत्ती शोधण्याची आता वेळ आली आहे, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केलं आहे. तुमची संपत्ती किती आहे आणि ती कुठे ठेवली आहे, असा सवालही दानवेंनी विचारला आहे.

दरम्यान माझ्या संपत्तीबाबत भाजपकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देण्यात आले आहे आणि त्यासाठी माझे शिवसैनिक समर्थ आहेत. भाजपकडून खालच्या पातळीवर प्रचार होतोय, असा प्रतिहल्ला उद्धव यांनी केला.