साहित्य संमेलन रिकामटेकड्यांचा उद्योग - नेमाडे

Updated: Nov 28, 2014, 01:34 PM IST
 साहित्य संमेलन रिकामटेकड्यांचा उद्योग - नेमाडे title=

 

पुणे : साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे, अशी परखड टीका कोसलाकार आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केलीय. राजकारणी आणि उद्योजकांकडून साहित्य संमेलनांसाठी पैसे घेतात अशी खरमरीत टीकाही त्यांनी केलीय. संमेलनासाठी शत्रूकडूनही पैसे घेतील असंही त्यांनी म्हटलय. पुण्यात नेमांडेंना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

शहाणपणाला मर्यादा असते, पण मूर्खपणाला मर्यादा नसते, असेही रोखठोक बोल यावेळी त्यांनी साहित्यिकांना सुनावले. 

महात्मा फुले पुण्यतिथीच्या निमित्त पुण्यातील फुले वाड्यात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. नेमाडे यांनी यावेळी महात्मा फुले यांच्या विविधांगी कार्यांचा गौरव केला. 'फुले-शाहू-आंबेडकरांना अलीकडं पडता काळ आल्यासारखं वाटत असलं तरी राजकारणात त्यांना महत्त्व आहेच. पण त्यांना फक्त पुतळ्यात अडकवणं चुकीचं आहे. त्यांचं विचारधन आजच्या काळासाठीही महत्त्वाचं आहे,' असं नेमाडे म्हणाले.
 
मराठी भाषा, शिक्षण, जात-पात आदी विषयांवरही त्यांनी परखड भाष्य केलं. 'महाराष्ट्रात मराठीतच शाळा असाव्यात. मराठी माध्यमांच्या शाळांतून इंग्रजीचे शिक्षण द्यायला हवं,' असं मतही नेमाडे यांनी व्यक्त केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.