उल्हासनगरमध्ये 9 लाख 76 हजार रूपयाच्या नव्या नोटा जप्त

उल्हासनगर मध्ये 9 लाख 76 हजार रूपयाच्या नव्या 2 हजाराच्या नोटा जप्त करण्यात आल्यात. याप्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Updated: Dec 13, 2016, 12:08 PM IST
उल्हासनगरमध्ये 9 लाख 76 हजार रूपयाच्या नव्या नोटा जप्त title=

ठाणे : उल्हासनगर मध्ये 9 लाख 76 हजार रूपयाच्या नव्या 2 हजाराच्या नोटा जप्त करण्यात आल्यात. याप्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नोटांच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरिकांच्या बँका तसेच एटीएमबाहेर रांगा लागलेल्या दिसत आहे. रांगांमध्ये उभे राहूनही त्यांना फक्त दोन किंवा चार हजार रुपये मिळतायत. 

अशातच उल्हासनगरात मोटरसायकलवरून जाणा-या तीन तरूणांकडून मध्यवर्ती पोलिसांनी 9 लाख 76 हजार रूपयाच्या 2000 च्या नव्या नोटा जप्त केल्या.