डोंबिवलीतील चोळेगाव गोळीबार आणि हत्या प्रकरणाला नवं वळण

संपूर्ण डोंबिवलीला हादरवणा-या चोळेगाव गोळीबार आणि हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक गोष्ट उघडकीस आली आहे. किशोर चौधरी यांची बेछूट गोळीबार करून हत्या करणाऱ्या भोईर कुटुंबीयांनी चौधरी यांचा कामगार महिमदास विल्सन याचीसुदधा निर्घृण हत्या केली आहे. 

Updated: May 14, 2017, 02:07 PM IST
डोंबिवलीतील चोळेगाव गोळीबार आणि हत्या प्रकरणाला नवं वळण title=

ठाणे : संपूर्ण डोंबिवलीला हादरवणा-या चोळेगाव गोळीबार आणि हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक गोष्ट उघडकीस आली आहे. किशोर चौधरी यांची बेछूट गोळीबार करून हत्या करणाऱ्या भोईर कुटुंबीयांनी चौधरी यांचा कामगार महिमदास विल्सन याचीसुदधा निर्घृण हत्या केली आहे. 

किशोर यांची हत्या केल्यानंतर भोईर कुटुंब महिमदासचे अपहरण करून फरार झाले होते. दोन दिवसांपूर्वी पोलिसांना ते शरण आल्यानंतर महिमदासचे काय केले याबाबत पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली. दिलीप भोईर आणि त्याच्या कुटुंबीयांनी महिमदासची हत्या करून त्याचा मृतदेह पोलादपूर आणि महाबळेश्वर मधील जंगलातील दरीत फेकून दिला होता. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी 2 दिवस शोधमोहीम सुरू केली असता अखेर महिमदासचा मृतदेह सापडला आहे.