आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्ड स्वीकारले जाणार नाहीत

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर डेबिट आणि क्रेडिट कार्ड न स्वीकारण्याचा निर्णय पेट्रोल पंप असोसिएशननं घेतला आहे.

Updated: Jan 8, 2017, 06:15 PM IST
आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर डेबिट-क्रेडिट कार्ड स्वीकारले जाणार नाहीत title=

मुंबई : आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर डेबिट आणि क्रेडिट कार्ड न स्वीकारण्याचा निर्णय पेट्रोल पंप असोसिएशननं घेतला आहे. पेट्रोल पंपावर डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास 0.25 टक्के ते एक टक्क्यापर्यंत चार्ज आकारण्याचा निर्णय एचडीएफसी बँकेनं घेतला आहे. या निर्णयाविरोधात पेट्रोल पंप असोसिएशन आक्रमक झाली आहे.

डिलर्सनं मिळणाऱ्या मार्जिनमध्ये अशा प्रकारे चार्ज आकारण्याची कोणतीही तरतूद नाही. या निर्णयामुळे डिलर्सचं वाढीव नुकसान होणार आहे. अगोदरच ग्राहकांना डिजीटल पेमेंट केल्यानंतर मिळणारा 0.75 टक्क्यांचा डिस्काऊंट डिलर्सना मिळत नाहीये, अशी प्रतिक्रिया पेट्रोल पंप असोसिएशनकडून देण्यात आली आहे.